Public Health Care / Hospitals in Raigad District in Marathi

रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा / रुग्णालये.


रायगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. पंधरा तालुका असलेले या जिल्ह्यातअलिबाग हे जिल्हा-मुख्यालय आहे. रायगड जिल्ह्याचा जलद गतीने विकास होत आहे. यात समुद्री किनारपट्टी, अनेक किनारे, अभयारण्य, खाड्या, नद्या, पर्वत, कारखाने, मासेमारी, कृषी, महामार्ग व रेल्वे मार्ग अशी सर्व समावेशकता आहे. 




भारताच्या इतर जिल्ह्यांप्रमाणेच रायगड मध्येही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे. या आरोग्य सेवेची ग्रामीण भागापासून ते वरच्या स्तरा पर्यंत म्हणजे जिल्हा पातळी अशी वर्गवारी आहे आणि त्यानुसारच त्या त्या ठिकाणी सेवा प्रधान केल्या जातात. 
रायगड जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य सेवा ही प्राथमिक, द्वितीय व तृतीयक अशा तीन स्तरामध्ये स्थापित केली आहे. 



सर्व उपकेंद्रे (उप) व प्राथमिक आरोग्य केंद्रे ही प्राथमिक आरोग्य स्तरात येतात जी खेड्यांमध्ये व दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतात. 

सर्व ग्रामीण रुग्णालये (आरएच), सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) आणि उपजिल्हा रुग्णालये ही दुसऱ्या टप्प्यात आहेत जी मोठ्या खेड्यात किंवा गावात दुसऱ्या टप्प्यातील आरोग्य सेवा प्रदान करतात. 

जिल्ह्यात तृतीय स्तराची सुविधा उपलब्ध आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा / सामान्य रूग्णालय लोकांना सर्वाधिक आरोग्य सेवा पुरवित आहेत. 

रायगड जिल्ह्यात खालील प्रकारचे हॉस्पिटल उपलब्ध आहे.

वैद्यकीय महाविद्यालय-तृतीय स्तर
सामान्य रुग्णालय -तृतीय स्तर 
उपजिल्हा रुग्णालय -द्वितीय स्तर
ग्रामीण रुग्णालय -द्वितीय स्तर
प्राथमिक आरोग्य केंद्र - प्राथमिक स्तर
उपकेंद्र -प्राथमिक स्तर

आपण खालील दुवे उघडू शकता आणि रायगडच्या सर्व तालुक्यांमधील सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीबद्दल वाचू शकता जसे की अलिबाग, कर्जत, खालापूर, पेण, पनवेल, उरण, मुरुड, रोहा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, महाड, माणगाव आणि पोलादपूर इ.


खालापूर तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

कर्जत तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

पनवेल तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

उरण तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

अलिबाग तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

मुरुड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

रोहा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

श्रीवर्धन तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

सुधागड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

पेण तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

पोलादपूर तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

म्हसळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

माणगाव तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

महाड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

तळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था


No comments:

Post a Comment