कुपोषण म्हणजे काय? लक्षणं|निदान|उपचार| कारणे|प्रतिबंध. -जयंत रुठे
मित्रांनो, आज आपण कुपोषण या विषयावर कुपोषणाच्या लक्षणांपासून ते प्रतिबंध कसा करावा इथपर्यंत सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आपल्याला किंवा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला कधीना कधी या समस्येतून जावे लागले असू शकते. नक्की कुपोषण होत कसे, त्याची काय लक्षणं आहेत आणि त्यावर आपण कशी उपाययोजना करावी यावर चर्चा करूया.
कुपोषण म्हणजे काय?
आपण दररोज सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण शिवाय इतर वेळेत वेगवेगळ्या अन्नपदार्थ सेवन करत असतो. अन्न खाल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि शरीराची कार्यप्रणाली व्यवस्थित चालते. याच अन्नातून आपल्या शरीराला आवश्यक पोषक अन्नघटक मिळतात जसे की जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे, कर्बोदके आणि इतर. परंतु हे अन्नघटक प्रमाणापेक्षा कमी किंवा प्रमाणापेक्षा जास्त आपल्या शरीराला मिळाले तरी आपल्या शरीराच्या कार्यप्रणालीत बदल होतो. पण पौष्टिक अन्नघटकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कुपोषण होतो. एकूणच, आहारातील पौष्टीक घटकांच्या कमतरतेमुळे किंवा आवश्यक आहारापेक्षा अपुऱ्या आहार सेवनाने कुपोषण होऊ शकतो.
कुपोषण हे वेगवेगळ्या परिमाणात मोजले जाते. परंतु त्याच्या प्रत्यक्ष संबंध हा आहाराशीच आहे हे कायम सत्य आहे. कुपोषण हे (wasting) उंचीनुसार कमी वजन, (stunting) वयानुसार कमी उंची, अपुरे जीवनसत्वे किंवा खनिजे, जादा वजन , लठ्ठपणा आणि आहार संबंधित noncommunicable रोगांचा समावेश आहे.
कुपोषण प्रामुख्याने लहान बालक, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकाळ आजारी व्यक्ती, पुरेसं अन्न उपलब्ध नसलेल्या किंवा कमी खाणाऱ्या, पौष्टीक पदार्थ खाण्यात किंवा शोषण्यात अडचणी असलेल्या व्यक्तीला कुपोषण होऊ शकतो.
पुरेसा व आहार न घेतल्यामुळे अशक्तपणा आणि आजारपणाची स्थिती निर्माण होते ती कुपोषण होय आणि त्या व्यक्तीला आपण कुपोषित व्यक्ती म्हणतो.
कुपोषणाची लक्षणं काय आहेत?
लहान बालके जेव्हा कुपोषित होतात तेव्हा त्यांच्यात साधारणपणे अशक्तपणा, सतत रडणे, चिडचिड, वयानुसार वाढ आणि शरीराचे वजन कमी असणे, शरीरावर सुजण येणे, धिमे वर्तनशील आणि धिमे बौद्धिक विकास अशी लक्षणे दिसतात.
तसेच मोठ्या माणसांमध्ये भूक, अन्न, पेये यामध्ये रस नसणे, थकवा जाणवणे, चिडचिड होणे, लक्ष केंद्रित नसणे, नेहमी थंडी वाटते, चरबी कमी होणे, आजारी पडणे आणि बरे होण्यास वेळ लागणे, तसेच जखमा बऱ्या होण्यास वेळ लागतो
कुपोषणाचे निदान आणि उपचार
कुपोषण हे बीएमआय BMI (Body Mass Index) उंचीनुसार कमी वजन (Wasting), वयानुसार कमी उंची (Stunting), या आधारे ठरवले जाते.
आपल्याकडे आशा, अंगणवाडी, जवळचे आरोग्य केंद्र , डॉक्टर अशा प्रशिक्षित लोकांचा सल्ला घेणे जास्त हितकारक आहे.
आपल्याकडे आशा, अंगणवाडी, जवळचे आरोग्य केंद्र , डॉक्टर अशा प्रशिक्षित लोकांचा सल्ला घेणे जास्त हितकारक आहे.
तुम्हाला कुपोषणाची कोणतीही लक्षणे जाणवल्यास जवळच्या तज्ञ डॉक्टरांशी संपर्क करावा. वैद्यकीय उपचार आणि आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आहाराचे नियोजन केल्यास यावर मात करता येते.
कुपोषणची कारणे
कुपोषण हे मुळात कु- पोषणाने होते, पण हे कु-पोषण होण्याची खूप सारी कारणे आहेत, आपण सोप्या शब्दांत समजून घेऊया.
आपल्या लहान बाळाला कुठुन पोषण आहार मिळतो. नवीन गर्भधारणा असेल तर आईच्या आहारातून, बाळ नुकतेच जन्मले असेल तर आईच्या स्तनपानातून, आणि बाळ थोडे मोठे असेल तर अंगणवाडी आणि स्वतःच्या घरातून. पण कुपोषण वाढीसाठी वैद्यकीय कारणांबरोबर सामाजिक आणि प्रशासकीय करणे अधिक आहेत.
• गर्भधारणा किंवा बाळ जन्मल्यानंतर पोषण आहाराची कमी.
• गर्भधारणा किंवा बाळ जन्मल्यानंतर आरोग्य सुविधेची कमी
• लवकर लग्न होणे किंवा कमी वयात गर्भधारणा होणे
• दोन मुलांमधील अंतर कमी असणे
• दोन पेक्षा अधिक मुले असणे
• पालकांचे मुलांच्या पोषण आहाराकडे होणारे दुर्लक्ष
• बेरोजगारी (रोजगार मिळाला तर पोषण आहार मिळणार)
• अशुद्ध पिण्याचे पाणी ( बऱ्याच आजारांचे मूळ)
• अपुऱ्या आरोग्य सुविधा (जरी व्यक्ती कुपोषित झाली तरी योग्य उपचाराने सुदृढ होते)
• स्थलांतर (यामुळे सुविधा पोचवणे कठीण)
• दर्जाहीन अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र
• यंत्रणांच्या समन्वयाचा अभाव
खुप सुंदर जयंत सर 👍👍👌👌
ReplyDelete