Livelihood Programs in India: Challenges and Opportunities in Mobilization and Placement

Livelihood Programs in India: Challenges and Opportunities in Mobilization and Placement

India is a largest populated country with 1.3 billion people. It has 70% population staying in rural areas. The rural economy is mostly defending on agriculture sector. Many people are small land holder, daily wagers which make difficult to fulfill their livelihood needs. Most of the people leaving the villages in search of livelihood and ultimately land in urban slums and live a miserable existence to earn and feed their families.


Government of India has initiated various livelihood programs to upgrade people economically. National Rural Livelihood Mission and National Skill Development Corporation are major promoting agencies for Livelihood Program in India. Recently the Government has launched the ‘Skill India’ campaign. The Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana and the Deen Dayal Upadhyay Grameen Kaushalya Yogna are flagship schemes in India. The skill development programs are filling the gap between demand and supply of skill worker to industry. Central Government, State Governments, Corporate Companies, Training Institutes and Organizations are ensuring to upgrade skills which help to generate more opportunities to unskilled workers.

Challenges and Opportunities in Mobilization:

The Livelihood Program implementing agency has many challenges while mobilizing community for particular programs. One of the main challenges training institutions face is not being able to attract enough students to their courses. While many factors contribute to this, a sheer lack of awareness and trust is a main factor. Most students turn to their parents for guidance and are often advised to aspire for government jobs. A bad planning for mobilization in the community would not work correctly. To following the systematic and strategic mobilization process would be more benefitted. The participation of local community institutions and local community leaders help mobilization to be more effective. The things help to make better mobilization such as a good strategic plan, need assessment process, developing a shared vision among community, authentic and productive roles of youth, participation of community for precious mobilization. We should engage civil societies, local organizations, community leaders, government officials, academic institutions, training institutions, hospitals and shopkeepers in mobilization process. The government has started to address the social stigma surrounding vocational professions through a national campaign to promote the dignity of working with ones however; it will take time for societal perception and behavior to change. The greatest opportunity for mobilization is media including social media. The digital world allows you to communicate mass level in different languages which directly impact though television, websites, smart phones, mobile and computer applications etc.

Challenges and Opportunities in Placement:

The biggest parameter to measure success of training institutions is their placement rate or the number of students they are able to arrange jobs. In an ideal scenario, companies should provide trained students a better salary than untrained hires. Even after placement in good jobs, there is a regular incidence of youth dropping out after the first six months for multiple reasons. Those who did not receive soft skill training find it hard to manage with the pressures of a formal work environment. Others who have taken up work in a state or city far away from their home town, after a point cannot deal with the unfamiliar food and language, difficult housing conditions and the lack of social support group. There is a need to promote and support organizations programs which aim to provide new and innovative solutions to existing systemic challenges and issues in Placement.

Written by Jayant Ruthe 

आशा - ASHA - Accredited Social Health Activist

आशा - ASHA - Accredited Social Health Activist 

आपल्या गावात काम करणाऱ्या आशा ASHA बद्दल आज सरळ सोप्या भाषेत समजून घेऊया. 



भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत प्रत्येक गावात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी  आशाची नेमणूक केली आहे. आशा कार्यकर्ता हि एक महिला असून ती बऱ्याच वर्षांपासून  किंवा येणाऱ्या बऱ्याच वर्षापर्यंत गावात राहणारी, लग्न झालेली किंवा विधवा किंवा परित्यक्ता किंवा घटस्फोटीत  स्वयंसेविका आहे. दहावी पास, २५ ते ४५ वय असलेल्या महिलेची आशा म्हणून  ग्रामपंचायत  नेमणूक करते. आदिवासी भागात आठवी पास आणि २० ते ४५ वय अशी पात्रता शिथिल केली आहे.  आदिवासी भागामध्ये 1000 लोकसंख्येमागे एक तर बिगर  आदिवासी भागात 1500 लोकसंख्येमागे एक आशा नेमली जाते. गावातील लोक आणि आरोग्य केंद्र यातील दुवा म्हणून आशा काम करते.


ग्रामसभेद्वारा निवड झाल्यानंतर व तालुका आरोग्य अधिका-यामार्फत नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर आशा प्रशिक्षणासाठी पात्र ठरते. हे  प्रशिक्षण  ७+४+४+४+४ असे एकुण २३ दिवस अशा प्रकारे ५ सत्रात विभागलेले असते.  प्रथम ७ दिवसांचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर आशा ला तिच्या कामगिरी वर आधारित प्रोत्साहनपर भत्ते प्राप्त होत असतात. प्रशिक्षणाला हजर राहील्यानंतरच आशा ला  प्रोत्साहनपर भत्ता प्राप्तीसाठी पात्र ठरते. आशा जरी स्वयंसेवक म्हणून काम करत असल्या तरी त्यांना त्यांच्या कामगिरीवर प्रोत्साहन म्हणून भत्ता दिला जातो. आशाच्या कार्याची नोंद एका नोंदवहीत घेतली जाते. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर महिन्यातून होणाऱ्या बैठकीवेळी भत्ता दिला जातो. 


आशा ला प्राथमिक स्वरूपाचे उपचार करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच ती  ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देते शिवाय ताप, सर्दी,  हगवण, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करते.  तसेच DOTS, Folic Acid सारख्या इतरही गोळयांचे वाटप करण्याची कामे आशा मार्फत केली जातात. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास आशा संबंधित यंत्रणेला त्वरित सूचना देते. ग्रामीण महिलांना बाळंतपणात सुखरुप प्रसुती, स्तनपान, लसीकरण, गर्भप्रतिबंधक उपाययोजना, जननेद्रीयांशी संबंधित जंतुसंसर्ग, लैगिंक संबंधातुन होणारे जंतुसंसर्ग, नवजात अर्भकाची काळजी इ. आरोग्यविषयबाबींसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास आशा सदैव तत्पर असतात.



अशी हि आशा,  तुमच्या आमच्या गावात सदैव आपल्या मदतीला तयार असते. 




What is Malnutrition | Symptoms |Diagnosis and Treatment |Causes| Prevention in Marathi

 

कुपोषण म्हणजे काय? लक्षणं|निदान|उपचार| कारणे|प्रतिबंध. -जयंत रुठे


मित्रांनो, आज आपण कुपोषण या विषयावर कुपोषणाच्या लक्षणांपासून ते प्रतिबंध कसा करावा इथपर्यंत सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आपल्याला किंवा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला कधीना कधी या समस्येतून जावे लागले असू शकते. नक्की कुपोषण होत कसे, त्याची काय लक्षणं आहेत आणि त्यावर आपण कशी उपाययोजना करावी यावर चर्चा करूया.



कुपोषण म्हणजे काय?


आपण दररोज सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण शिवाय इतर वेळेत वेगवेगळ्या अन्नपदार्थ सेवन करत असतो. अन्न खाल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि शरीराची कार्यप्रणाली व्यवस्थित चालते. याच अन्नातून आपल्या शरीराला आवश्यक पोषक अन्नघटक मिळतात जसे की जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे, कर्बोदके आणि इतर. परंतु हे अन्नघटक प्रमाणापेक्षा कमी किंवा प्रमाणापेक्षा जास्त आपल्या शरीराला मिळाले तरी आपल्या शरीराच्या कार्यप्रणालीत बदल होतो. पण पौष्टिक अन्नघटकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कुपोषण होतो. एकूणच, आहारातील पौष्टीक घटकांच्या कमतरतेमुळे किंवा आवश्यक आहारापेक्षा अपुऱ्या आहार सेवनाने कुपोषण होऊ शकतो. 

कुपोषण हे वेगवेगळ्या परिमाणात मोजले जाते. परंतु त्याच्या प्रत्यक्ष संबंध हा आहाराशीच आहे हे कायम सत्य आहे. कुपोषण हे (wasting) उंचीनुसार कमी वजन, (stunting) वयानुसार कमी उंची, अपुरे जीवनसत्वे किंवा खनिजे, जादा वजन , लठ्ठपणा आणि आहार संबंधित noncommunicable रोगांचा समावेश आहे.

कुपोषण प्रामुख्याने लहान बालक, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकाळ आजारी व्यक्ती, पुरेसं अन्न उपलब्ध नसलेल्या किंवा कमी खाणाऱ्या, पौष्टीक पदार्थ खाण्यात किंवा शोषण्यात अडचणी असलेल्या व्यक्तीला कुपोषण होऊ शकतो.

पुरेसा व आहार न घेतल्यामुळे अशक्तपणा आणि आजारपणाची स्थिती निर्माण होते ती कुपोषण होय आणि त्या व्यक्तीला आपण कुपोषित व्यक्ती म्हणतो. 

कुपोषणाची लक्षणं काय आहेत?


लहान बालके जेव्हा कुपोषित होतात तेव्हा त्यांच्यात साधारणपणे अशक्तपणा, सतत रडणे, चिडचिड, वयानुसार वाढ आणि शरीराचे वजन कमी असणे, शरीरावर सुजण येणे, धिमे वर्तनशील आणि धिमे बौद्धिक विकास अशी लक्षणे दिसतात.

तसेच मोठ्या माणसांमध्ये भूक, अन्न, पेये यामध्ये रस नसणे, थकवा जाणवणे, चिडचिड होणे, लक्ष केंद्रित नसणे, नेहमी थंडी वाटते, चरबी कमी होणे, आजारी पडणे आणि बरे होण्यास वेळ लागणे, तसेच जखमा बऱ्या होण्यास वेळ लागतो 

कुपोषणाचे निदान आणि उपचार

कुपोषण हे बीएमआय BMI (Body Mass Index) उंचीनुसार कमी वजन (Wasting), वयानुसार कमी उंची (Stunting), या आधारे ठरवले जाते. 

आपल्याकडे आशा, अंगणवाडी, जवळचे आरोग्य केंद्र , डॉक्टर अशा प्रशिक्षित लोकांचा सल्ला घेणे जास्त हितकारक आहे. 

तुम्हाला कुपोषणाची कोणतीही लक्षणे जाणवल्यास जवळच्या तज्ञ डॉक्टरांशी संपर्क करावा. वैद्यकीय उपचार आणि आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आहाराचे नियोजन केल्यास यावर मात करता येते. 

कुपोषणची कारणे

कुपोषण हे मुळात कु- पोषणाने होते, पण हे कु-पोषण होण्याची खूप सारी कारणे आहेत, आपण सोप्या शब्दांत समजून घेऊया. 

आपल्या लहान बाळाला कुठुन पोषण आहार मिळतो. नवीन गर्भधारणा असेल तर आईच्या आहारातून, बाळ नुकतेच जन्मले असेल तर आईच्या स्तनपानातून, आणि बाळ थोडे मोठे असेल तर अंगणवाडी आणि स्वतःच्या घरातून. पण कुपोषण वाढीसाठी वैद्यकीय कारणांबरोबर सामाजिक आणि प्रशासकीय करणे अधिक आहेत.

• गर्भधारणा किंवा बाळ जन्मल्यानंतर पोषण आहाराची कमी.
• गर्भधारणा किंवा बाळ जन्मल्यानंतर आरोग्य सुविधेची कमी
• लवकर लग्न होणे किंवा कमी वयात गर्भधारणा होणे 
• दोन मुलांमधील अंतर कमी असणे 
• दोन पेक्षा अधिक मुले असणे 
• पालकांचे मुलांच्या पोषण आहाराकडे होणारे दुर्लक्ष 
• बेरोजगारी (रोजगार मिळाला तर पोषण आहार मिळणार) 
• अशुद्ध पिण्याचे पाणी ( बऱ्याच आजारांचे मूळ) 
• अपुऱ्या आरोग्य सुविधा (जरी व्यक्ती कुपोषित झाली तरी योग्य उपचाराने सुदृढ होते) 
• स्थलांतर (यामुळे सुविधा पोचवणे कठीण)
• दर्जाहीन अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र 
• यंत्रणांच्या समन्वयाचा अभाव 

कुपोषणाला प्रतिबंध कसा करावा?
कुपोषण हे फार मोठा आजार किंवा समस्या नाही. आणि कोणी कुपोषित झाल्यास घाबरण्याचे काहीही कारण नाही. परंतु कुपोषण हे होऊच नये यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहेच.

पोषण- कुपोषण हे अविरत समाजात टिकून राहतील. कारण कुपोषण हे प्रामुख्याने आपल्या आहारावर अवलंबून आहे. पण हेच कुपोषण रोखण्यासाठी सर्वांनी पोषण आहारविषयक माहिती घेऊन सर्वांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे. आपण जातीत जास्त पोषण घटक असलेले अन्नपदार्थ सेवन केले पाहिजे. किंबहुना ज्यांच्याकडे पोषण आहाराचा अभाव आहे त्यांना याचा पुरवठा केला पाहिजे.

वृद्ध आणि लहान मुले, गंभीर किंवा तीव्र आजार असलेल्या लोकांना आवश्यक पोषण आहार मिळण्याची खात्री करावी लागेल .

कुपोषणाची कोणतीही लक्षणे दिसू लागली तर संबधित व्यक्तीला निदान आणि उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दररोजच्या आहारात सर्व पोषण घटकांचा वापर वाढवून आवश्यक अन्नपदार्थांचे सेवन करावे.

गर्भधारणे नंतर मातेला व बाळ जन्मल्यानंतर बाळाला स्तनपान आणि पोषण आहार मिळाला पाहिजे, तसेच वेळोवेळी पुरेशी आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे.

मुलींचे लग्नासाठी विहित वय पूर्ण असताना आणि शारीरिक परिपक्वता असल्यानंतरच लग्न करणे गरजेचे आहे तसेच मुलींची गर्भधारणा ही शारिरीक पूर्ण वाढ झाल्यानंतर व्हायला हवी.

दोन मुलांच्या जन्मांमध्ये आवश्यक अंतर ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून पहिल्या बाळाची योग्य वाढ आणि विकास होइल तसेच मातेची पहिल्या बाळंतपणात झालेली झिज भरून निघेल. मात्र जुळी मुलं ही याला अपवाद असतील.

कुटुंब नियोजन करून दोन पेक्षा अधिक मुले असु नयेत यासाठी काळजी घेणे.

मुलांच्या पोषण आहाराकडे पालकांनी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

सर्वांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे हा अधिकार असूनही वर्षातला खूप काही काळ हा अशुद्ध पाणी पिण्यात घालवावा लागतो त्यामुळे पाण्यातून मिळणारे पोषक घटक मिळत नाहीच शिवाय अशुध्द पाणी पिल्याने इतर आजारांनाही निमंत्रण मिळते.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुपोषण झालाच तरी त्यावर नियंत्रण मिळवता येतो किंवा त्यातून बाहेर पडता येते. पण हे सगळे आरोग्य यंत्रणेवर अवलंबून आहे. पोषण आणि आरोग्य यंत्रणा जितक्या लोकसेवेसाठी सक्षम आणि प्रतिबद्ध असतील तितकेच अधिक सक्षमतेने कुपोषणावर मात करता येऊ शकते.


बेरोजगारीमुळे लोकांना आपले आहार अधिक पोषणयुक्त ठेवणे फार कठीण होते. शासन स्तरावरून रोजगार निर्मिती करण्यात आणखी प्रयत्न व्हायला पाहिजेत जेणेकरून लोकांना रोजगार मिळेल आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल. यामुळे लोकांच्या कु-पोषणावर नियंत्रण ठेवणे शक्य होइल.

अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र यांचा दर्जा सुधारणे फार गरजेचे आहे शिवाय ज्या यंत्रणा पोषण आणि आरोग्य विषयावरील काम करत आहेत त्यांना आपसात अधिक समन्वय ठेवावा लागेल.

(लेखातील माहिती ही स्व-अनुभव तसेच अभ्यास गटातून संकलित केली आहे.- जयंत रुठे)

Public Health Care / Hospitals in Raigad District in Marathi

रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा / रुग्णालये.


रायगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. पंधरा तालुका असलेले या जिल्ह्यातअलिबाग हे जिल्हा-मुख्यालय आहे. रायगड जिल्ह्याचा जलद गतीने विकास होत आहे. यात समुद्री किनारपट्टी, अनेक किनारे, अभयारण्य, खाड्या, नद्या, पर्वत, कारखाने, मासेमारी, कृषी, महामार्ग व रेल्वे मार्ग अशी सर्व समावेशकता आहे. 




भारताच्या इतर जिल्ह्यांप्रमाणेच रायगड मध्येही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे. या आरोग्य सेवेची ग्रामीण भागापासून ते वरच्या स्तरा पर्यंत म्हणजे जिल्हा पातळी अशी वर्गवारी आहे आणि त्यानुसारच त्या त्या ठिकाणी सेवा प्रधान केल्या जातात. 
रायगड जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य सेवा ही प्राथमिक, द्वितीय व तृतीयक अशा तीन स्तरामध्ये स्थापित केली आहे. 



सर्व उपकेंद्रे (उप) व प्राथमिक आरोग्य केंद्रे ही प्राथमिक आरोग्य स्तरात येतात जी खेड्यांमध्ये व दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतात. 

सर्व ग्रामीण रुग्णालये (आरएच), सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) आणि उपजिल्हा रुग्णालये ही दुसऱ्या टप्प्यात आहेत जी मोठ्या खेड्यात किंवा गावात दुसऱ्या टप्प्यातील आरोग्य सेवा प्रदान करतात. 

जिल्ह्यात तृतीय स्तराची सुविधा उपलब्ध आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा / सामान्य रूग्णालय लोकांना सर्वाधिक आरोग्य सेवा पुरवित आहेत. 

रायगड जिल्ह्यात खालील प्रकारचे हॉस्पिटल उपलब्ध आहे.

वैद्यकीय महाविद्यालय-तृतीय स्तर
सामान्य रुग्णालय -तृतीय स्तर 
उपजिल्हा रुग्णालय -द्वितीय स्तर
ग्रामीण रुग्णालय -द्वितीय स्तर
प्राथमिक आरोग्य केंद्र - प्राथमिक स्तर
उपकेंद्र -प्राथमिक स्तर

आपण खालील दुवे उघडू शकता आणि रायगडच्या सर्व तालुक्यांमधील सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीबद्दल वाचू शकता जसे की अलिबाग, कर्जत, खालापूर, पेण, पनवेल, उरण, मुरुड, रोहा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, महाड, माणगाव आणि पोलादपूर इ.


खालापूर तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

कर्जत तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

पनवेल तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

उरण तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

अलिबाग तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

मुरुड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

रोहा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

श्रीवर्धन तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

सुधागड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

पेण तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

पोलादपूर तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

म्हसळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

माणगाव तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

महाड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

तळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था


Public Health Care / Hospitals in Raigad District


Raigad is a District in Konkan division of Maharashtra state of India. Alibag is a District Headquarter with fifteen talukas . Raigad is developing district. It has sea coast, many beaches, sanctuary, creeks, rivers, mountains, factories, fishing, agricultural, highways and rail routes etc.



In the Raigad district, The Health Care System is set up into three layers as Primary , Secondary and tertiary. 

All Sub Centers (Sub) and Primary Health Centers (PHC) comes in primary stage which provide primary health care services in villages and remote areas. 

All Rural hospitals (RH), Community Health Centers (CHC) and Sub District Hospitals are in secondary stage which provide secondary health care services in bigger village or town. 

The tertiary level is highest facility in the district. All Medical colleges, District/General Hospital are provide highest health care to people. 



Following types of Hospital available in Raigad district.

  1. General Hospital - Tertiary Level
  2. Medical colleges - Tertiary Level
  3. Sub District Hospital - Secondary Level
  4. Rural Hospital - Secondary Level
  5. Primary Health Center - Primary Level
  6. Sub Center -Primary Level


You can open below links and read specifically about public health care system in all talukas of Raigad like Alibag, Karjat, Khalapur, Pen, Panvel, Uran, Murud, Roha, Sudhagad, Shrivardhan, Mhasala, Tala, Mahad, Mangaon and Poladpur etc. 


Public Health Care System in Khalapur 
खालापूर तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Karjat
कर्जत तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Panvel
पनवेल तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Uran
उरण तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Alibag
अलिबाग तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Murud
मुरुड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Roha
रोहा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Shrivardhan
श्रीवर्धन तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Sudhagad
सुधागड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in PEN
पेण तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Poladpur
पोलादपूर तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Mhasala
म्हसळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Mangaon
माणगाव तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Mahad
महाड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

Public Health Care System in Tala
तळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था